उद्देश
या संकेतस्थळाचा उद्देश मराठी साहित्यातील विविध विषय चर्चेला जाणे आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी माहिती पूर्ण लेखन उपलब्ध करून देणे असा आहे. मराठी साहित्य आणि त्यातील विविध प्रकार तसेच सामाजिक सांस्कृतिक विषयांवरील विविध लेखन येथे वाचण्यास मिळेल. विस्मृतीत गेलेल्या लोककला आणि लोक साहित्य , मराठी भाषेची निगडित असलेले विविध पैलू व साहित्यप्रकार यावर भाष्य करण्याचा लेखकाचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
परिचय
मारुती रामचंद्र लामखडे तथा मा.रा. लामखडे (हल्ली मुक्काम केळेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर) यांचा जन्म 27 जुलै 1949 रोजी केळेवाडी येथे झाला. सध्या ते निवृत्त प्राध्यापक असून पूर्णवेळ शेतकरी आहेत. राष्ट्रसेवा दलाचा सैनिक आणि समाजवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षापासून आजपर्यंत त्यांनी काम केले. प्राध्यापकाची नोकरी करतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक,